महिला उद्योग केंद्र
विधवा, परित्यक्ता आणि दारिद्य्ररेषेखाली जगणार्या सुशिक्षित बेरोजगार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी ट्रस्टने महिला उद्योग केंद्राची निर्मिती मे 1990मध्ये केली. पापड, लोणची, सांडगे, मसाले, चटण्या, मुरंबा, सॉस आदी निर्मितीतून या केंद्राने या महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी आधार दिला. येथे तयार झालेल्या उत्पादित मालाची विक्री पुणे शहरात आणि महाराष्ट्रात अन्यत्रही करण्याची व्यवस्था ट्रस्टने केली. येथे काम करणार्या महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याने त्यांच्या जीवनात परिवर्तनाचे साधन म्हणून या केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….