सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या संकल्पनेतून बीजारोपण झालेले हे पुरस्कार म्हणजे समाजाच्या सर्व क्षेत्रांतील प्रज्ञावंतांचे उतराई होण्याचा प्रयत्न आहे.
ट्रस्टच्या शताब्दी महोत्सवात झालेल्या अवाढव्य खर्चाबाबत कुवळेकरांनी एक लेख लिहिला होता. गणपती हा विद्या, कला, संस्कृतीचा देव आहे. त्यामुळे उत्सव हवा. पण देवाची खरी पूजा कुठली? विद्येच्या, कलेच्या पाठीशी उभं राहणं, त्याला प्रोत्साहन देणं ही गणपतीची खरी पूजा. त्यामुळे उत्सवाबरोबर समाजिक भानही हवं. उत्सवावर दरवर्षी भलीमोठी रक्कम खर्च होणार असेल, तर त्यातली पाच टक्के रक्कम ही अशा कामांवर खर्च केली तर त्यातून खूप गोष्टी उभ्या करता येईल,’ असं त्यांनी लेखात सुचवलं होतं. या निधीला त्यांनी विद्यानिधी असं नावं दिलं होतं. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांनी हा लेख वाचला. त्यांना ही कल्पना फार आवडली. ते लगेच कुवळेकरांकडे चेक घेऊनच गेले. तुमची कल्पना चांगली आहे. तुम्ही मांडली आहे, तुम्हीच उभी करा,’ असं त्यांनी सुचवलं आणि याच विद्यानिधीतून सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांची सुरुवात झाली.
जीवनाच्या विविध क्षेत्रांत समर्पणभावनेनं समाजोपयोगी कार्य उभं केलेल्या विविध क्षेत्रांतील नामवंतांना हा पुरस्कार दिला जातो. रोख रु.5,000, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर पणशीकर, संगीत रंगभूमी गाजवणारे भार्गवराम आचरेकर, प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद, मराठीचे ज्येष्ठ समीक्षक गो.म. कुलकर्र्णी, प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत विठाबाई नारायणगावकर हे काही ठळक पुरस्कार विजेते.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….