गणेशजन्म सोहळा

Dnyanvardhan Abhiyanगणेशजन्म सोहळा हा मंगलमूर्तीच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि धुमधडाक्याने संपन्न होतो. या दिवशी मंदिर आणि मंदिराचा कळस फुलांनी आणि विद्युत रोषणाईने नटतो. पहाटे चार वाजल्यापासून गणरायांच्या आगमनाची तयारी सुरू असते. मंगलमूर्तींच्या नामाचा जयघोष आणि आवर्तने ब्रह्मवृंदाकडून सुरू झालेली असतात. श्रींच्या चांदीच्या मूर्तीवर पंचामृताचा आणि फळांच्या रसाचा महाअभिषेक केला जातो. सोबत ब्रह्मवृंद आणि गुरुजींद्वारे गणेशयाग केला जातो. बाळगणेश जन्म सोहळ्यासाठी आलेल्या माता-भगिनींच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण, पाळणा, महाआरती होते. सभामंडपात फुलांनी नटवलेल्या चांदीच्या पाळण्यात गणपती बाप्पाला ठेवण्यात येतं. गणेशाला प्रिय असणार्या दुर्वा, शमी, गुळ-खोबरे, मोदक, पेढे, बर्फी, विविध प्रकारची फुले, हार, पूजा साहित्य, तसेच रेशमी लाल कपड्यात गोपाळाला चांदीच्या ताटात ठेवले जाते. जसजशी गणेश जन्माची वेळ जवळ येते, तसतसे अंगाईगीत, पाळणा आनंदात सुरू होतो. दुपारी बारा वाजता बाप्पाच्या जयघोषात बाळ गणेशाचा जन्म होतो.

गणेश जन्माचा हा सोहळा प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा करतो. वाजंत्रीच्या निनादात गणेश जन्म सोहळ्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मंदिर आणि परिसरात भाविकांना पेढे आणि बुंदीचे लाडू वाटप केलं जातं. हा गणेशजन्माचा धार्मिक सोहळा पाहून भाविक तृप्त होतात.

Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….