जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान

Dnyanvardhan Abhiyanपंढरपूरचा श्री पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. या पांडुरंगाची ओढ लागलेल्या लाखो भाविकांना सर्वार्थानं एक करणारा, आनंददायी सोहळा म्हणजे आषाढी वारी. या वारीच्या निमित्ताने देहू-आळंदीहून पंढरपूरला पायी जाणारे लाखो वारकरी पंधरा दिवसांचा अखंड प्रवास करत पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ राहतो. वाटेत येणार्या ऊन-वारा-पाऊस यांची तमा त्यांना नसते. आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांहून निघणार्या या पालख्या पुण्यात मुक्कामी येतात. येथून श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी दिवेघाटातून सासवडमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. वारीच्या या वाटेवर वारकर्यांना ऊन-वारा-पावसाचा येणारा अडथळा काही प्रमाणात कमी करता येईल का, याचा विचार ट्रस्टने केला आणि यातूनच जय गणेश निसर्ग संवर्धन अभियानाची सुरुवात झाली.

27 ऑगस्ट 2014 रोजी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते दिवेघाट ते सासवड दरम्यान पालखी मार्गावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. गणरायाच्या आगमन मिरवणुकीचे औचित्य साधून महाराष्ट्रात, विशेषतः महामार्गांवर पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे. ट्रस्टने जी झाडे महामार्गावर कडेला लावली आहेत, त्यांची जोपासना आणि संवर्धनाचे काम संबंधित ग्रामपंचायती स्वीकारत आहेत. अशा प्रकारचे वृक्षारोपण करण्याचे आवाहन ट्रस्टने अन्य सेवाभावी संस्थांनाही केले आहे. त्यामुळे तापमान कमी होण्यास मदत होणार असून, पावसाचे प्रमाणही वाढण्याची आशा आहे. पर्यावरण समतोल राखण्यासही या मोहिमेची मदत होणार आहे.

Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….