पोलिओ निर्मूलन मोहीम
ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रश्नाला दगडूशेठ ट्रस्टनं अलीकडच्या काळात हात घातला असला, तरी आरोग्याच्या बाबतीत ही दखल पूर्वीपासूनच घेतली आहे. 1989-90मध्ये आलेल्या रोगराईच्या साथीमुळे त्या भागातील आरोगाच्या समस्यांची जाण ट्रस्टला झाली होती. आदिवासी, ग्रामीण आणि डोंगरी भागांत राहणार्या शेतमजुरांचे जीवन जगणार्या अनेक पालकांना आपल्या मुलाबाळांना पोलिओ-ट्रिपल आणि अन्य औषधपाणी देण्यासाठी तालुक्यात वा दवाखान्यात जाण्यासाठी पुरेसा पैसाही नसतो, ही बाब ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांच्या लक्षात आली होती. याच काळात शासनानं पोलिओ निर्मूलनाची मोहीम हाती घेतली होती. मात्र या मोहिमेला अपेक्षित यश मिळत नव्हतं. लसी आणि औषधोपचार ग्रामीण भागात पोचवणं गरजेचं होतं, पण आदिवासी, डोंगरी भागांतले कच्चे रस्ते आणि बिकट परिस्थिती यांमुळे शासनाच्या गाड्या आणि मदत पुरेशा प्रमाणात तेथे पोचू शकत नव्हती. त्या वेळच्या जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांकडून हा विषय ट्रस्टला समजला. या भागात आरोग्य सेवा सुरू करण्याचा ट्रस्टचा मानस होताच, त्यामुळे हा विषय कळल्यानंतर त्यांनी लगेच या मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी ट्रस्टच्या वतीने पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी टाटा 608 ही गाडी दिली. ही गाडी म्हणजे फिरते दवाखानेच होय. सहा जणांच्या टीममध्ये दोन डॉक्टर, दोन परिचारिका, एक कंपाउडर आणि एक शिपाई यांचा समावेश होता. पोलिओ डोसबरोबरच अन्य वैद्यकीय सेवाही या व्हॅनमधून पुरवली जात असे.
पोलिओ निर्मूलनची मोहीम राबवताना या टीमला अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. अनेकदा जीव धोक्यात घालावा लागला. या टीमने भीमाशंकर, आंबेगाव परिसरातला डोंगराळ भाग, खेड-जुन्नर-पाईटचा दुर्गम भाग, पानशेतचा वरचा भाग अशा ठिकाणी जाऊन, वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरून गाव न् गाव पिंजून काढलं. शासनानं सुरू केलेल्या पोलिओ निर्मूलन चऴवळीला फारसं यश येतं नव्हतं. जवळपास 50 टक्केच काम झालं होतं. मात्र, ट्रस्टच्या मदतीनं हे काम सुरू झालं आणि नंतर ते 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी झालं. आजपर्यंत हजारो नागरिकांना या सेवेचा लाभ घेतला आहे.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….