रात्र महाविद्यालय
समाजात विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी असतात. काहींना कुटुंबाचा, तर काहींना सेवाभावी संस्थांचा आधार मिळतो. त्यामुळे त्यांना जीवनात यश×स्वी होता आलं. पण काही मुलांच्या नशिबी एवढंही भाग्य नसतं. शिकण्याची अपार इच्छा असते, मात्र कुटुंबीयांकडून अपेक्षित प्रोत्साहन मिळत नाही. परिस्थितीमुळे अकाली वयातच त्यांच्या बुद्धीपेक्षा त्यांच्या श्रमालाच जास्त मोल येतं आणि अशा परिस्थितीतही शिकण्याची इच्छा असेल तर एकाच वेळी शिक्षण आणि काम, अशी दुप्पट मेहनत करूनच जगणं त्यांच्या वाट्याला येतं. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले असणारं एक ठिकाण म्हणजे रात्र शाळा आणि महाविद्यालय.
सरस्वती विद्या मंदिर संस्थेचं पूना नाईट स्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ज्युनिअर नाईट कॉलेज, म्हणजे अकरावी आणि बारावीसाठीची रात्रशाळा. अशा गरजू मुलांसाठी ती वरदानच ठरत आहे. दगडूशेठ ट्रस्टनं इतर शाळांत सुरू केलेली जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना या रात्र महाविद्यालयातही सुरू केली आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही शिकता येत नाही, ज्यांच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे, अशा हुशार विद्यार्थ्यांना जय गणेश विद्यार्थी पालक योजनेअंतर्गत ट्रस्ट दत्तक घेते. त्यांना रात्र महाविद्यालयात ट्रस्टकडून संपूर्ण शैक्षणिक साहित्याची मदत मिळते. त्यात विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या संस्कार वर्गाचाही फायदा होतो. शिवाय त्यांचं आठवड्यातून तीनदा समुपदेशन केलं जातं. त्यात त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात आणि त्या सोडवण्याचाही प्रयत्न केला जातो. अशा विद्यार्थ्यांना ट्रस्टकडून आर्थिक-मानसिक प्रोत्साहन मिळतं.
या रात्रशाळेत शिकलेले सागर पवार, सद्दाम मुजावर यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केली आहे.
रात्रशाळेच्या दत्तक योजनेमुळे कुटुंबाला आधार देतानाच आपल्या भविष्याचीही स्वप्नं पाहण्याची संधी या मुलांना मिळाली आहे.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….