संगीत महोत्सव
सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा दीर्घ काळ रसिकांच्या पसंतीला उतरलेला संगीत महोत्सव. सर्वसामान्य संगीत रसिकांना त्यांच्या आवाक्यातल्या तिकीट दरांमध्ये मिळणारी ती मेजवानीच. पण त्या तिकिटासाठीचा खर्चही झेपण्याची ऐपत नसणार्याचं काय, या विचारातून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांनी 1984मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई संगीत महोत्सवाला सुरुवात केली. शालीवाहन शकाचा प्रारंभ, नव्या वर्षीचा चैत्र गुढीपाडवा हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा वर्धापन दिन असतो. याच दिवशी गणरायांची षोडशोपचार पूजा संगीत महोत्सवाने सुरू होते. जागतिक कीर्तीचे, भारतातील ख्यातनाम गायक, वादक, नर्तक, संगीतकार आदी कलाकार या संगीत महोत्सवात श्रींच्या दरबारात हजेरी लावतात. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद अल्लारखा खाँ, पं. विश्वमोहन भट, पं. जसराज, उस्ताद अमजद अली खाँ, सुधीर फडके, अरुण दाते, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा खाडिलकर, उस्ताद झाकीर हुसेन, सुरेश वाडकर अशा अनेक दिगज्जांनी संगीतशारदेच्या या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. कानसेन पुणेकरांसाठी हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच ठरतो. हजारो रसिक स्वंयशिस्तीने येथे येतात; गाण्याचा, वादनाचा, संगीताचा मनसोक्त आनंद घेतात आणि तृप्त होऊन जातात.
गुडीपाडव्यापासून सुरू होणार्या या महोत्सवाची सांगता रामनवमीस होते. आधी भर रस्त्यावर, नंतर शनिवारवाड्याच्या पटांगणावर आणि आता गणेश कला क्रीडा मंचावर होणारा हा निरपवाद एकमेव आणि अद्वितीय असा सर्वांसाठी निःशुल्क महोत्सव आहे.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….