शिवजयंती व्याख्यानमाला
सार्वजनिक गणेशोत्सवातून जनजागृतीच्या लोकमान्य टिळकांच्या विचारांची परंपरा घेऊन चाललेल्या ट्रस्टने 1960 सालापासून शिवजयंती व्याख्यानमालेचं ज्ञानसत्र सुरू केलं आहे. पूर्वी गणेशोत्सवात संपन्न होणारी ही व्याख्यानमाला गणेशोत्सवातील वाढती गर्दी आणि अपूरी जागा विचारात घेऊन शिवजयंतीच्या महोत्सवाचा अविभाज्य भाग करण्यात आली आहे.
शिवरायांचे क्षात्रतेज, महाराष्ट्राची अस्मिता आणि डोळस वृत्ती यासाठी हे ज्ञानसत्र कटिबद्ध राहील, याची दक्षता ट्रस्ट आजवर घेत राहिलं आहे. एकता, अखंडता, राष्ट्रधर्म, लोकशाही, न्याय, धर्म, राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, सामाजिक आदर्श यांबरोबरच देशाची आणि महाराष्ट्राची स्थिती, नियोजन, रोजगार, शेती, कामगार प्रश्न, कायदे आदी प्रश्नांबाबत लोकजागृतीचे कार्य करण्यासाठी विचारवंताची, तज्ज्ञांची, प्रज्ञावंतांची, साहित्यकांची व्याख्याने आयोजित केली जातात. या व्याख्यानांमुळे लोकशिक्षण, जनजागरण, वैचारिक प्रबोधनाच्या प्रक्रियेतून महाराष्ट्रातील माणूस आज उभा राहात आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रातील ही व्याख्यानमाला नवी ताकद नवे सामर्थ्य देत आहे. विनामूल्य चाललेल्या या ज्ञानसत्रात हजारो पुणेकर सहभागी होतात, हे या व्याख्यानमालेचे यशच म्हणावं लागेल.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….