शुद्ध पाणी व्यवस्था

Dnyanvardhan Abhiyanपाण्यामुळं पसरणार्या रोगांचं प्रमाण ग्रामीण भागात जवळपास नव्वद टक्के असतं. पाणीपुरवठा शुद्ध असेल तर या सर्वच रोगांना आळा बसतो. दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं 2011 साली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाच्या दर्जाबरोबर किंवा त्याही पेक्षा जास्त चिंतेचा विषय असतो तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचं प्रश्‍न. शाळांमधल्या शिक्षणेत्तर सोयींमध्ये अतिशय दुलर्क्षित झालेला हा विषय. या पाण्यातूनच बहुसंख्य संसर्गजन्य आजार होतात. बारामती तालुक्यातला बराचसा भाग हा क्षारपड जमिनीखाली येतो. त्यामुळे तिथल्या पाण्यातसुद्धा क्षार मोठ्या प्रमाणात आढळतात. या परिसराला जेजुरीच्या नाझरे धरणातून पाणीपुरवठा होतो. या पाण्यातही क्षारांचं प्रमाण आहेच. गावातल्या विंधन विहिरींना क्षारयुक्त पाणी येतं. या पाण्यामुळे इथल्या लोकांना आणि अर्थातच इथल्या शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना अनेक आजार होतात. मुख्यतः मुतखड्यासारख्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे इथं शुद्ध पाण्याची व्यवस्था होणं फार गरजेचं होतं. दगडूशेठ ट्रस्टनं ही समस्या लक्षात घेऊन शाळेत शुद्ध पाण्याचं किट बसवलं. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाच, त्याचबरोबर गावातले लोकही शुद्ध पाणीपुरवठा होणार्या टाकीतून पाणी घेऊन जाऊ लागले. त्यामुळे इथल्या गावातल्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्‍नही या उपक्रमाद्वारे दूर झाले.

पाणी शुद्ध होण्याचे किट बसवलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आजारांमुळे असणारी अनुपस्थितीही जवळपास बंद झाली आहे आणि स्वाभाविकच मुलांची शैक्षणिक गुणवत्ताही सुधारली आहे.

Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….