विसर्जन मिरवणूक

Dnyanvardhan Abhiyan

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक हे गणेशोत्सवातील एक प्रमुख आकर्षण असते. दरवर्षी आपण बाप्पाची मिरवणूक ही मयुररथातून काढली जाते. या रथाला विलोभनीय रोषणाईने सजवले जाते. ही सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. या मिरवणूक रथाचे वैशि×ष्ट्य म्हणजे दरवर्षी एका नव्या रथात बाप्पाला विराजमान केले जाते. कधी तो शेषात्मज रथावर, तर कधी मयुरेश रथावर स्वार होतो. दरवर्षी रथाची प्रतिकृती वेगवेगळी असते. याच रथाचं अप्रतिम सौंदर्य पाहण्याकरता रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. पोलिसांच्या बंदोबस्ताबरोबरच ट्रस्टचे कार्यकर्ते, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते मिरवणुकीत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतात. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक जण झटत असतो. या मिरवणुकीत बाप्पाच्या दिमतीला प्रभात व दरबार बॅन्ड आणि स्वरूप वर्धिनी संस्थेचे ढोल-ताशा-पथक असते. शेवटी शिरस्त्याप्रमाणे विसर्जनापूर्वी श्रींची आरती करून घाटावर श्रींचं विसर्जन केलं जातं.

Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….